आमच्या विषयी

कुणबी सेवासंघात आपले स्वागत आहे.

कुणबी सेवा संघ, लांजे या संस्थेमार्फत, आरंभी लांजा तालुक्यात व्हॉलटरी शाळा, नंतर लांजा येथे काळे छात्रालय, दापोली येथे नवभारत छात्रालय व पू. सामंत गुरुजी कन्या छात्रालय, तसेच कृषिकेंद्र असे उपक्रम चालविले जात होते. कुणबी सेवा संघ, दापोली ही संस्था १९८६ साली स्थापन झाली. दापोलीत संस्थेचे काम वाढत गेल्याने संस्थेचे विभाजन करुन लांजा येथील उपक्रम कुणबी सेवा संघ, लांजे व दापोली येथील उपक्रम कुणबी सेवा संघ, दापोली या संस्थांकडे सुपुर्त करण्याचे ठरले. त्यानुसार २००५ साली शासन मान्यतेने दोन्ही संस्थांचे विभाजन करण्यात आले.

आमचे ध्येय

संस्थेच्या कार्यक्षेत्रातील जाती, धर्म, पंथ यांचा विचार न करता मुख्यत्वे दुर्बल समाज घटकांचे शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक व सर्वांगीण सुधारणा यासाठी काम करणे.

१९८६

मध्ये स्थापना केली

आम्हालाच का निवडावे

आपण सर्वजण मिळून का वेगळे ठरतो

विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि शेती विकास या सर्व क्षेत्रांमध्ये आम्ही एकत्रितपणे कार्य करतो.

  • शेतकऱ्यांसाठी मजबूत पाठबळ
  • स्वावलंबनासाठी कौशल्याधारित शिक्षण
  • तळागाळापर्यंत पोहोचणारे कार्य
  • शिक्षणाद्वारे मुलींचे सशक्तीकरण
  • पारदर्शकता आणि विश्वास यांची बांधिलकी
  • चला, आपण सर्व मिळून अधिक उज्ज्वल आणि आशादायी उद्याची निर्मिती करूया.

40+

वर्षांचा अनुभव

5K+

विद्यार्थी

400+

नवभारत छात्रालय परिवार