प्रा. रघुनाथ गीते यांनी विद्येच्या क्षेत्रात असामान्य पराक्रम बजावून नवभारत छात्रालयाला स्थापनारंभीच आपली स्वत:ची अशी खास ओळख प्राप्त करुन दिली. गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ते प्रेरणास्थान आणि विद्येच्या क्षेत्रातील मानदंड बनून राहिले. प्रा. रघुनाथ गीते यांनी संस्थेला रुपये १,२५,०००/- देणगी दिली. विद्वत्तेला चारि«य आणि दातृत्व गुणांची जोड देऊन ते खऱ्या अर्थाने छात्रभूषण ठरले.
त्यांचा आदर्श आपल्या छात्रांसमोर सदैव रहावा म्हणून संस्थेने वर उल्लेख केलेल्या रक्कमेत भर घालून त्यांच्या नावे निधी संकलित केला असून निधीच्या व्याजातून नवभारत छात्रालय, पू. सामंत गुरुजी कन्या छात्रालय आणि छात्रालय परिवारातून गरजू, होतकरु, गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सहाय्य दिले जाते. या निधीमध्ये रु. ५,००,०००/- इतकी रक्कम जमा आहे. या निधीच्या व्याजातून सुध्दा छात्रालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक गरजा पूर्ण केल्या जातात.