सामान्य गुण मिळवून शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फारसे शैक्षणिक भवितव्य नसते. नापास झालेल्यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. अशा विद्यार्थ्यांना अल्पखर्चात विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले तर ते आर्थिकदृष्टया स्वावलंबी होऊ शकतील अशा विचाराने संस्थेने २००२ साली महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या मान्यतेने व्यवसाय शिक्षण विद्यालय सुरु केले. विद्यालयात “कॉम्प्युटर ऑपरेशन विथ् एम. एस. ऑफिस” हा इयत्ता ९ वी पास विद्यार्थ्यांसाठी ६ महिने मुदतीचा अभ्यासक्रम सुरु होता. अल्प फी देखील देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “स्वावलंबन शिक्षण” ही योजना आहे. सध्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण या उपक्रमामार्फत देण्यात येते.